अबोलीची फुलं...
अबोलीची फुलं परवा पिवळी झाली होती
मला समजत नव्ह्तं,
आज ती अशी का वागत होती ?
काल ती अचानक लाल झाली.
जगाला अगदी ओरडून सांगू लागली -
मला नाही असंच कोमेजून जायचं,
मला नाही असंच कोमेजून जायचं...
मला...
मला अगदी मनापासून वाटतंय,
त्याचं व्हायचं !
क्षणभर वाटलं...
वाटलं जाऊन अलगद तीला हातात घ्यावं,
नाही कोमेजून जायची,
तीला आपल्या ओंजळीनं पाणी दयावं.
जमलंच तर तीला एक नवं जीवन दयावं !
मग ऊमजलं ती आपली नव्ह्ती...
म्हणूनच का ती अशी लाल-पिवळी झाली होती ?